Mr. B. D. Kher has so far published 117 books and nearly 25,000 pages of writing! Many of his novels became popular. His two novels 'Sanjeevan' on the life of Saint Dnyaneshwar Maharaj, which he wrote at the age of 89, and 'Gandharva Gatha' on the life of Balgandharvas, published at the age of 90, also gained great popularity.
Mr. Kher had dreamed of becoming a writer at the age of 6... On September 3, 1939, his first collection of stories 'Nadalhari' was published.
His novels on social issue are 'Anand Janmala', 'Ai Majhi Aahe', 'Nandadeep' in the background of Panshet flood, 'Gulabache Phool', 'Krantichya Watevar', 'Berlin Gangela Milale' which explained the importance of family planning were liked by the readers at that time.
After that Mr. Kher's 'Yagya' was the first biographical novel on Savarkar. This novel received an unprecedented response from the readers. 'Yagna' was followed by 'Amritputra' (Lal Bahadur Shastri), 'Anand Bhavan', 'Prabuddha' (Dr. Ambedkar), 'Chanakya', 'Hasare Dukh' (Charlie Chaplin), 'Krantifule' (Chapekar brothers), ' Many of his biographical novels like 'Samarsaudamini' (Queen of Jhashi), 'Tuka Jhala Pandurang' were particularly popular.
In 1976, the Japan Foundation invited him to Japan to write a novel on 'Hiroshima'. During his stay in Japan, he saw the minds, bodies and places destroyed by the atomic bomb. After working continuously for eight years, he proved the novel 'Hiroshima'. In August 1984, this novel was published at the hands of former Deputy Prime Minister Mr. Yashwantrao Chavan in Pune. Yashwantrao also wrote a lengthy preface to this novel. In 2003, this novel was published in English at the hands of Dr. A.P.J. Abdul Kalam, the then President of India.
Before that, in 1968, Shri. Kher was sent to Tashkent. At the same time, he went to Germany to get information for a novel about Subhash Chandra Bose and also to London for a novel on the life of Charlie Chaplin. However, he could not write a novel on Subhash Chandra.
Journalism:- He was the co-editor of 'Agrani' for some time. Later he was the co-editor of 'Kesari' for 22 years. He held the post of editor of 'Sahyadri' for 10 years. He was an editor of the seven volumes of 'Samrag Lokmanya Tilak'. His translation of the world famous novel 'The Princess' written by Manohar Malgaonkar in serial form was first published in 'Sahyadri' and later in book form. The novel also became the highest selling translated literature. Kher also brought Malgaon's novels 'Adhantari', 'Wadalwara' into Marathi.
Awards / Honours:-
- 'Soviet Land Nehru Award' for the novel 'Anand Bhavan'
- 'Sahityasmarat Kelkar Award' for the novel 'Hasare Du:kh'
- 'Soviet Land Nehru Award' and Maharashtra Government's 'Hari Narayan Apte' Award for the novel 'Hiroshima'.
- Maharashtra Sahitya Parishad Lifetime Achievement Award.
- 2005 Shivaji Sawant Smriti Sahitya ('Mrityunjay') Award.
- On May 28, 2003, the English translation of his novel 'Hiroshima' 'Bell of Hiroshima' was commissioned by UNESCO and the World Peace Center by Chief Minister Sushilkumar Shinde in the presence of President Dr. Abdul Kalam.
- Producer of 'Ramayana' series himself. By Ramanand Sagar Mr. Kher was publicly felicitated in Pune on his 75th birthday.
- He was felicitated two times by the then Prime Minister Indira Gandhi on the occasion of editing the entire Lokmanya Tilak 7000 pages and on the occasion of Kesari Shatabdi.
- Speech opportunity from Moscow Radio.
- N.H.K. Bh on the television channel Japan. The. Kher was interviewed.
- His work was duly noticed by local and foreign newspapers.
- His books were translated into many languages.
- Ph.D from Pune University for Ph.D on Kher's biographical novels.
- M.Phil was also done on 'Hiroshima'.
'ज्या देशात गंगा, गीता, सविता आणि हिमगिरी आहे ते राष्ट्र जगात श्रेष्ठ आहे!'
स्व. श्री. भा. द. खेर यांची आजवर ११७ पुस्तके प्रकाशित होऊन जवळपास २५,००० पृष्ठांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे! त्यांच्या अनेक कादंबऱ्या वाचकप्रिय ठरल्या. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी लिहिलेली संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील ‘संजीवन' आणि ९०व्या वर्षी प्रकाशित झालेली त्यांची बालगंधर्वांच्या जीवनावरील ‘गंधर्वगाथा' या दोन कादंबऱ्यांनाही चांगलीच लोकप्रियता लाभली.
श्री. खेरांनी वयाच्या ६व्या वर्षीच साहत्यिक होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. एल्. एल्. बी. झाल्यानंतर वकिली न करता ते साहित्यक्षेत्राकडे वळले. ३ सप्टेंबर १९३९ रोजी त्यांचा ‘नादलहरी' हा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला.
'विजय' ही भा. द. खेरांची पहिली कादंबरी. त्यानंतर कुटुंबनियोजनाचे महत्त्व विशद करणारी ‘आनंद जन्मला', ‘आई माझी आहे', पानशेत पुराच्या पार्श्वभूमीवरील ‘नंदादीप', ‘गुलाबाचं फूल', ‘क्रांतीच्या वाटेवर', ‘बर्लिन गंगेला मिळाले' अशा सामाजिक कादंबऱ्या त्या त्या काळात वाचकांना आवडल्या.
त्यानंतर श्री. खेरांची ‘यज्ञ' ही स्वा.सावरकरांवरील पहिली चरित्रात्मक कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीला वाचकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. प्रकाशनपूर्व नोंदणीचा विक्रमही श्री. खेरांच्या नावावर आहे. ‘यज्ञ'नंतर ‘अमृतपुत्र' (लाल बहादूर शास्त्री), ‘आनंदभवन', ‘प्रबुद्ध' (डॉ. आंबेडकर), ‘चाणक्य', ‘हसरे दु:ख' (चार्ली चॅप्लिन, 'क्रांतिफुले', (चापेकर बंधू), ‘समरसौदामिनी' (झाशीची राणी), ‘तुका झाला पांडुरंग' अशा त्यांच्या अनेक चरित्रात्मक कादंबऱ्या विशेष गाजल्या.
१९७६ साली जपान फाऊंडेशनने त्यांना ‘हिरोशिमा'वर कादंबरी लिहिण्यासाठी जपानला निमंत्रित केले. जपानच्या वास्तव्यात त्यांनी अणुबाँबमुळे उद्ध्वस्त झालेली मने, शरीरे आणि ठिकाणे बघितली. आठ वर्षे सतत परिश्रम करून त्यांनी ‘हिरोशिमा' ही कादंबरी सिद्ध केली. १९८४च्या ऑगस्टमधे उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते ही कादंबरी पुण्यात प्रसिद्ध झाली. यशवंतरावांनी या कादंबरीला आवर्जून प्रदीर्घ प्रस्तावनाही लिहिली. २००३ साली ही कादंबरी युनेस्को आणि 'वर्ल्ड पीस सेंटरतर्फे मा. राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या अध्यक्षतेखाली आणि मा. श्री. सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुण्यात प्रकाशित झाली; तर १९९६ मधे या कादंबरीची नवी आवृत्ती केंद्रीय कृषीमंत्री ना. शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशित झाली. जागतिक शांततेसाठी एका मराठी साहित्यिकाने ४० वर्षे उराशी बाळगलेले साहित्य-स्वप्न साकार झाले.
त्यापूर्वी १९६८साली लाल बहादूर शास्त्री यांच्यावर कादंबरी लिहिण्यासाठी भारत सरकारच्या वतीने श्री. खेरांना ताश्कंदला पाठवण्यात आले. त्याचवेळी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातील कादंबरीकरिता माहिती मिळवण्यासाठी ते जर्मनीला आणि चार्ली चॅप्लिनच्या जीवनावरील कादंबरीसाठी लंडनलाही जाऊन आले. सुभाषचंद्रांवरील कादंबरी मात्र ते लिहू शकले नाहीत.
पत्रकारिता:- ‘अग्रणी'चे ते काही काळ सहसंपादक होते. पुढे ‘केसरी'चे ते २२ वर्षे सहसंपादक होते. ‘सह्याद्री'चे १० वर्षे संपादक-पद त्यांनी भूषविले. ‘समग्र लोकमान्य टिळक' या सात खंडांचे ते एक संपादक होते. मनोहर माळगावकर लिखित 'दि प्रिन्सेस' या जगप्रसिद्ध कादंबरीचा मालिका स्वरूपात त्यांनी केलेला अनुवाद प्रथम ‘सह्याद्री'मधून आणि नंतर पुस्तकरूपात प्रकाशित झाला. अनुवादित साहित्याचा विक्रीचा उच्चांकही या कादंबरीने केला. ‘अधांतरी', ‘वादळवारा' या माळगावकरांच्या कादंबऱ्याही खेरांनी मराठीत आणल्या.
पुरस्कार / मानसन्मान:-
- ‘आनंदभवन' या कादंबरीला ‘सोव{एत लॅण्ड नेहरू पुरस्कार'
- ‘हसरे दु:ख' या कादंबरीला ‘साहित्यसम्राट केळकर पुरस्कार'
- ‘हिरोशिमा' या कादंबरीला ‘सोविएत लॅण्ड नेहरू पुरस्कार' आणि महाराष्ट्र शासनाचा ‘हरि नारायण आपटे' पुरस्कार.
- महाराष्ट्र साहित्य परिषद जीवनगौरव पुरस्कार.
- २००५चा शिवाजी सावंत स्मृती साहित्य (‘मृत्युंजय') पुरस्कार.
- २००३ सालच्या २८ मे रोजी त्यांच्या 'हिरोशिमा' या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद ‘बेल ऑफ हिरोशिमा' युनेस्को आणि वर्ल्ड पीस सेंटरतर्फे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या उपस्थितीत एम. आय. टी.मधे प्रसिद्ध झाला.
- ‘रामायण' मालिकेचे निर्माते स्व. रामानंद सागर यांच्या हस्ते श्री. खेरांचा पंचाहत्तरीनिमित्त पुण्यात जाहीर सत्कार करण्यात आला.
- ‘समग्र लोकमान्य टिळक ७०००पृष्ठांच्या संपादनकार्या निमित्त आणि केसरी शताब्दी निमित्त, असा दोन वेळा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
- मॉस्को रेडिओ वरून भाषणाची संधी.
- एन्.एच्.के. जपान या दूरचित्रवाणी वाहिनीवर भा. द. खेरांची मुलाखत घेतली गेली.
- देशी-परदेशी वृत्तपत्रांमधून त्यांच्या कार्याची यथोचित दखल घेतली गेली.
- अनेक भाषांत त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झाले.
- खेरांच्या चरित्रात्मक कादंबऱ्यांवर पी.एच्.डी.साठी पुणे विद्यापीठातून पीएच.डी केली गेली.
- ‘हिरोशिमा'वर एम.फील.ही केली गेली.
Home <<< Translated Books About Contact >>>