Home Books Biographical Novels >>>
हसरे दुःख
चार्ली चॅप्लिनच्या जीवनावरील ही मराठीतील बेस्ट-सेलर कादंबरी- राजहंस प्रकाशन
चार्ली चॅप्लिनच्या जीवनावरील हृदयद्रावक कादंबरी. चार्लीच्या बालपणापासून त्याच्या अखेरीपर्यंतचा जीवनालेख या कादंबरीमध्ये अतिशय प्रत्ययकारीपणे मांडला आहे.
Buy: Paperback
चाणक्य
आर्य चाणक्याच्या जीवनावरील चित्तवेधक कादंबरी... प्रजेवर अत्त्याचार करणाऱ्या धनानंद राजाला पदभ्रष्ट करून चंद्रगुप्ताला चाणक्याने राजसिंहासनावर बसवलं. सिकंदराच्या आक्रमणाविरोधात भारतातील गणराज्यांना एकसंध करून चाणक्याने ते परकीय आक्रमण परतवलं. तो इतिहास सांगणारी प्रत्ययकारी कादंबरी.
हिरोशिमा
पहिल्या अणुबॉम्बने प्रभावित झालेल्या हिरोशिमाची कहाणी (महा-कादंबरी) भा. द. खेरांनी हिरोशिमा-नागासाकीला १९७६ साली प्रत्यक्ष भेट देऊन अणुबॉम्बने प्रभावित झालेल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या, उध्वस्त झालेल्या व्यवस्थेसह उध्वस्त मानवतेचाही विचार-अभ्यास केला. शिवाय दुसऱ्या महायुद्धाचा अभ्यास करून, आठ वर्षांच्या परिश्रमातून ही महाकादंबरी सिद्ध केली.
समरसौदामिनी
झाशीच्या राणीच्या जीवनावरील हृदयद्रावक कादंबरी - विहंग प्रकाशन... राणी लक्ष्मीबाईंनी आपलं संस्थान वाचवण्यासाठी इंग्रजांशी शर्थीने झुंज दिली. तिच्या स्त्री सहकारी सुंदर-मुंदर आदींनी इंग्रजांशी प्राणपणानं लढा दिला. पण अखेर तिचा क्रूर अंत केला गेला. राणीचा पराक्रम रेखाटणारी ही हृदयद्रावक कादंबरी.
Buy: Paperback
तुका झाला पांडुरंग
संत तुकाराम महाराजांच्या जीवनावरील हृद्य कादंबरी - विहंग प्रकाशन. संत तुकाराम महाराजांच्या दैवी जीवनावरील ही हृदयस्पर्शी वास्तवदर्शी कादंबरी. ह्या कादंबरीत महाराजांच्या बालपणापासून त्यांच्या अंतिम महायात्रेपर्यंतचा प्रवास रेखाटला आहे.
Buy: Paperback
गंधर्वगाथा
कलेवरील निष्ठा, प्रेम, भक्ती, गोड गळा आणि अस्सल सौंदर्याचं लेणं लाभलेल्या बालगंधर्वांच्या जीवनावरील रससिद्ध कादंबरी - मेहता पब्लिशिंग हाउस... मराठी रंगभूमीवरील महान कलावंत बालगंधर्व. महाराष्ट्राला पडलेलं एक पहाट-स्वप्न! यशाची शिखरं गाठलेल्या या कलावंतानं दुर्दैवाचे दशावतारही अनुभवले. त्यांच्या जीवनावरील ही आत्मकथनात्मक कादंबरी.
क्रांतिफुले
स्वातंत्र्यासाठी एकाच घरातील तीन बंधू फासावर गेल्याचं हे जगातील एकमेव उदाहरण. फाशी जाताना दामोदरपंत चापेकर टिळकांना म्हणाले, ' मी मृत्यूला घाबरत नाही. मी जे काही केलं ते देशासाठी केलं.' असीम त्यागाचं उदाहरण असणाऱ्या या तीन वीरांच्या क्रांतिकार्यावर आधारित चित्तथरारक कादंबरी.
Home Books Biographical Novels >>>