भा. द. खेर पुरस्कार / मानसन्मान:-
- ‘आनंदभवन' या कादंबरीला ‘सोविएत लॅण्ड नेहरू पुरस्कार'
- ‘हसरे दु:ख' या कादंबरीला ‘साहित्यसम्राट केळकर पुरस्कार'
- ‘हिरोशिमा' या कादंबरीला ‘सोविएत लॅण्ड नेहरू पुरस्कार' आणि महाराष्ट्र शासनाचा ‘हरि नारायण आपटे' पुरस्कार.
- महाराष्ट्र साहित्य परिषद जीवनगौरव पुरस्कार.
- २००५चा शिवाजी सावंत स्मृती साहित्य (‘मृत्युंजय') पुरस्कार.
- ‘रामायण' मालिकेचे निर्माते स्व. रामानंद सागर यांच्या हस्ते श्री. खेरांचा पंचाहत्तरीनिमित्त पुण्यात जाहीर सत्कार.
- दोन वेळा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार.
- मॉस्को रेडिओ वरून भाषण
- एन्.एच्.के. जपान या दूरचित्रवाणी वाहिनीवर भा. द. खेरांची मुलाखत.
- अनेक भाषांत त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झाले.
- खेरांच्या चरित्रात्मक कादंबऱ्यांवर पी.एच्.डी.साठी पुणे विद्यापीठातून पीएच.डी केली गेली.
- ‘हिरोशिमा'वर एम.फील.ही केली गेली.